गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यात ढगाळ हवामान आहे. किडीचा प्रादुर्भाव होण्याचा धोका निर्माण झाल्याने फळबाग उत्पादक चांगलेच धास्तावले आहेत. जिल्ह्यात द्राक्ष, डाळिंब ,सीताफळ, पेरू,अंजीर या फळबागांचे मोठे क्षेत्र आहे. पाऊस पडल्यास नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे.
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यासह राज्याच्या बहुतांशी भागात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. त्याचा परिणाम पिकांवर होत आहे. रब्बीच्या पेरण्या सुरु होत आहेत. पेरणी झालेल्या मका, ज्वारी, गहू पिकांनाही ढगाळ हवामानाचा फटका बसण्याची शक्यता आहे.
अधिक माहितीसाठी क्लिक करा