कृषी विभागाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत द्राक्षबागांचे नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण होण्यासाठी प्लॅस्टिक कव्हर योजना जाहीर केली होती; मात्र योजनेतील अडचणीच्या ठरत असलेले निकष व अटी शिथिल करण्याबाबत महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाने कृषी विभागाकडे पाठपुरावा केला होता.

यावर राज्यस्तरीय समितीने जिल्ह्यातील बागलाण, चांदवड व दिंडोरी तालुक्यांत भेटी दिल्यानंतर अखेर योजनेत आवश्यक बदलांच्या अनुषंगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. कृषी विभागाच्या राज्यस्तरीय तज्ज्ञ समितीचे शास्त्रज्ञ, विषयतज्ज्ञ, कृषी अधिकारी यांनी गुरुवारी (ता.४) तांत्रिक निकषानुसार प्लॅस्टिक कव्हरची उभारणी केलेल्या शेतकऱ्यांकडे भेटी देऊन पाहणी केली.

या समितीमध्ये महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी मंडळाचे प्रकल्प व्यवस्थापक दत्तात्रय काळभोर, राज्य तांत्रिक सल्लागार सचिन मोरे, बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी विभागाचे डॉ. हरिश्चंद्र जाधव, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे शास्रज्ञ डॉ. ए. के.उपाध्याय,

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या द्राक्ष व कांदा संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. रवींद्र पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, कृषी उपसंचालक महेश वेठेकर यांसह शेतकरी प्रतिनिधी म्हणून द्राक्ष बागायतदार संघाचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब गडाख, मानद सचिव बबनराव भालेराव आदी उपस्थित होते.

https://agrowon.esakal.com/agro-special/movement-for-changes-in-plastic-cover-scheme-rat16

माहिती शेअर करा