नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) परतीच्या प्रवासाला वेग आला आहे. तब्बल पंधरा दिवसांनी मॉन्सूनचा थांबलेला परतीचा प्रवास सुरू झाला आहे. शुक्रवारी (ता. १०) संपूर्ण गुजरातसह महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहारच्या काही भागांतून मॉन्सून परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. पुढील दोन ते तीन दिवसांत मॉन्सून महाराष्ट्राचा निरोप घेण्याची शक्यता आहे.

यंदा १४ सप्टेंबर रोजी मॉन्सूनने पश्‍चिम राजस्थानमधून परतीचा प्रवास सुरू केला आहे. दीर्घकालीन सर्वसाधारण वेळेपेक्षा (१७ सप्टेंबर) तीन दिवस आधीच राजस्थानमधून मुक्काम हलवला. त्यानंतर मजल-दरमजल करत परतीचा प्रवास सुरू असताना, २६ सप्टेंबरपासून मॉन्सूनचा प्रवास थांबला. तब्बल दोन आठवड्यांनी परतीच्या मॉन्सूनने पुढील वाटचाल सुरू केली.

शनिवारी (ता. १०) संपूर्ण गुजरातसह महाराष्ट्राचा उत्तर भाग, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहारच्या काही भागांतून मोसमी वारे परतले आहेत. मॉन्सूनच्या परतीची सीमा अलिबाग, अहिल्यानगर, अकोला, जबलपूर, वाराणसी, रक्सौलपर्यंत असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले.

https://agrowon.esakal.com/weather-news/monsoon-will-bid-farewell-to-maharashtra-rat16

माहिती शेअर करा