भारत आणि युरोपियन युनियनमधील मुक्त व्यापार करारातील वाटाघाटी पूर्ण झाल्या आहेत. या करारातून सोयापेंड, अन्नधान्य, तांदूळ, काही फळे आणि भाजीपाला, डेअरी तसेच पोल्ट्रीला वगळले आहे. मात्र या करारामुळे कापड, तयार कपडे, सागरी उत्पादने, रबर, चमड्याची उत्पादने, फर्निचर निर्यात शुल्कमुक्त होणार आहे. भारताने ऑलिव्ह तेल, प्रक्रियायुक्त अन्न आणि काही फळांवरील आयात शुल्क काढले आहे.

भारत आणि युरोपियन युनियनदरम्यान जवळपास दोन दशकांपासून व्यापार करारासंदर्भात वाटाघाटी सुरू होत्या. अखेर मंगळवारी (ता.२७) या कराराच्या वाटाघाटी पूर्ण झाल्या आहेत.यामुळे भारताच्या अनेक वस्तूंच्या युरोपियन युनियनमधील २७ देशांमध्ये शुल्कमुक्त निर्यातीला प्रोत्साहन मिळणार आहे. अमेरिकेने भारताच्या आयातीवर ५० टक्के शुल्क लागू केल्यामुळे निर्यातीवर मोठा परिणाम झाला होता. त्यामुळे युरोपियन युनियनसोबतच मुक्त व्यापार करार दोन्ही बाजूंसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

मुक्त व्यापार करारात भारतातून निर्यात होणाऱ्या ९३ टक्के वस्तूंवर युरोपियन युनियनमध्ये शुल्क लागू होणार नाही. तर ऑटोमोबाइल आणि स्टीलसह ६ टक्के वस्तूंवरील आयात शुल्क कमी केले जाणार आहे आणि कोटा ठरवून युरोपियन युनियन आयात शुल्क लागू करणार आहे. मुक्त व्यापार करार लागू झाल्याच्या पहिल्या दिवसापासून युरोपियन युनियन ९० टक्के वस्तूंवरील आयात शुल्क काढणार आहे.

https://agrowon.esakal.com/agro-special/india-eu-free-trade-agreement-concluded-with-key-farm-sectors-excluded-rat16

माहिती शेअर करा