रब्बी हंगामात पीक विमा योजनेत आतापर्यंत १८ लाख ७९ हजार विमा अर्ज दाखल आहेत. गेल्या रब्बीच्या तुलनेत आतापर्यंत अर्जाची संख्या केवळ २६ टक्के आहे ज्वारीच्या विमा काढण्यासाठी आता केवळ एकच दिवस उरला तर गहू, कांदा आणि मक्याचा विमा काढण्यासाठी १५ दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने आपण पेरलेल्या पिकाचा विमा काढावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
आतापर्यंत विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांची संख्या कमी दिसते त्याचे महत्वाचे कारण म्हणजे यंदा रब्बीची पेरणी उशिरा होत आहे.
खरिपाचा पेरा उशिरा झाल्यामुळे खरिपातील पिकांची काढणीही उशिरा झाली.
अधिक माहितीसाठी क्लिक करा