दोन्ही समुद्रात घोंघावत असलेल्या कमी दाब प्रणालींच्या प्रभावामुळे राज्यात पावसाने तडाखा दिला आहे. आज (ता. २७) कोकण, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) आहे. उर्वरित राज्यात ढगाळ आकाशासह उकाडा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

पावसाला पोषक हवामान असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पावसाने तडाखा दिला आहे. मराठवाडा आणि विदर्भातही हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली. रविवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांत नाशिक जिल्ह्यातील देवळा येथे राज्यातील सर्वाधिक ११० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर वणी, निफाड, पिंपळगाव बसवंत, कोकणातील डहाणी येथे ७० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद होत अतिवृष्टी झाली. ‎तर डहाणू येथे राज्यातील सर्वाधिक ३४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात कमाल तापमानात चढ-उतार होत आहेत.

https://agrowon.esakal.com/weather-news/heavy-rain-alert-in-maharashtra-yellow-alert-for-konkan-central-regions-mj18

माहिती शेअर करा