शेतातील पिकांचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी तारेचे कुंपण हा उत्तम पर्याय आहे. मात्र त्याचा खर्च अनेक शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यामुळेच राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी तार कुंपण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना काटेरी तार आणि लोखंडी खांबांसाठी अनुदान मिळते.

तसेच, एक ते दोन हेक्टर शेतीसाठी ९० टक्के अनुदान, दोन ते तीन हेक्टर शेतीसाठी ६० टक्केअनुदान, तीन ते पाच हेक्टर शेतीसाठी ५० टक्के अनुदान, तर पाच हेक्टरपेक्षा जास्त शेतीसाठी ४० टक्के अनुदान मिळते. तर, उर्वरित रक्कम अर्जदार शेतकऱ्याने स्वतः भरावी लागेल.

योजनेचा उद्देश

ही योजना शेतकऱ्यांच्या पिकांचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण करते, नुकसान कमी करून उत्पादन वाढवते आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत देते.

https://agrowon.esakal.com/agro-special/how-to-apply-online-for-wire-fencing-subsidy-in-maharashtra-rat16

माहिती शेअर करा