द्राक्ष उद्योगापासून वार्षिक २२ हजार ५०० कोटी रुपयांची उलाढाल असून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष राज्यातील लाखो हातांना रोजगार मिळतो. परंतु, उत्पादन खर्च चौपट, शासनाची चुकीची धोरणे, व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक, नैसर्गिक संकट व दाराच्या घरसरणीचे ग्रहण लागल्याने राज्यातील द्राक्ष उत्पादक कर्जाच्या विळख्यात सापडला आहे.
त्यामुळे राज्यातील द्राक्षाखालील क्षेत्र झपाट्याने कमी होत असून, गेल्या वर्षभरात ६० हजार एकर क्षेत्रातील बागाच शेतकऱ्यांनी काढून ते नव्या पिकाकडे वळले आहेत.
राज्यात चार लाख पन्नास हजार एकरांवर द्राक्षबागा आहेत त्यातून जवळपास वार्षिक २२ हजार ५०० कोटी रुपयांची उलाढाल होते सरकार तरीही या उद्योगाकडे म्हणावे तेवढे गांभीर्याने लक्ष देत नाही.

अधिक माहितीसाठी क्लिक करा

माहिती शेअर करा