केंद्र सरकारने २५ शेतपिकांचे नवीन १८४ सुधारित वाण जारी केले आहेत. यात १२२ तृणधान्ये (६० भात वाण), ६ कडधान्ये, १३ तेलबिया, ११ चारा पिके, ६ ऊस, २४ कापूस (२२ बीटी कापसासह) आणि ज्यूट व तंबाखूच्या प्रत्येकी एक वाणाचा समावेश आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी हे नवीन वाण प्रसारित केले

भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) संस्था, राज्य तसेच केंद्रीय कृषी विद्यापीठे आणि खासगी बियाणे कंपन्यांनी हे वाण विकसित केले आहेत. ही सर्व हवामान सहनशील, उच्च उत्पादन देणारी आणि प्रमुख कीड आणि रोग प्रतिरोधक आहेत.‘‘ हवामान बदल, क्षारपड जमीन, दुष्काळ आणि इतर जैविक व अजैविक ताण यासारख्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर टिकाव धरण्याच्या उद्देशाने हे नवीन वाण विकसित केले आहेत. तसेच ते नैसर्गिक आणि सेंद्रिय शेती पद्धतींसाठी अनुकूल असे आहेत,’’ असे यासंदर्भात जारी केलेल्या निवेदनात म्हंटले आहे.

https://agrowon.esakal.com/market-intelligence/184-new-varieties-of-twenty-five-crops-released-rat16

माहिती शेअर करा