सेंद्रिय पद्धतीने पीक लागवडीमध्ये महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानावर असून सेंद्रिय शेतीमाल उत्पादनात पहिल्या क्रमांकावर असल्याची माहिती नागपूर येथील प्रादेशिक सेंद्रिय शेती केंद्राचे संचालक डॉ.अजयसिंग राजपूत यांनी दिली महाराष्ट्रातील सुमारे सात लाखांवर क्षेत्र नव्याने प्रमाणीकरणाच्या प्रक्रियेत असल्याची माहिती त्यांनी दिली.
डॉ.राजपूत म्हणाले, की आरोग्यप्रती जागरूकता वाढीस लागल्याने कीटकनाशक अंश विरहित शेतीमालास जागतिकस्तरावर आणि देशाअंतर्गत मागणी वाढली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात भारतातही सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती पद्धतीने शेतीमाल उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढती आहे.
अधिक माहितीसाठी क्लिक करा