परभणी व हिंगोली जिल्ह्यात शनिवार (ता. १३) पर्यंत यंदाच्या खरीप हंगामातील ४ लाख ९२ हजार ७०४ हेक्टर क्षेत्रावरील ई पीक पाहणी झाली आहे. शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणीस शनिवार (ता. २०) पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यात ई -पीक पाहणी करावयाच्या प्लॉटची एकूण संख्या ७ लाख ४५ हजार ८०५ असून त्यापैकी ३ लाख ३४ हजार ६७८ प्लॉट (४४.८७ टक्के) नोंदणी झाली आहे. शनिवार (ता. १३) पर्यंत एकूण ३ लाख ५ हजार ४७९ हेक्टर क्षेत्राची ई पीक पाहणी झाली.
हिंगोली ई पीक पाहणी कराव्याच्या प्लॉटची एकूण संख्या ४ लाख ९५ हजार ९१२ असून त्यापैकी २ लाख ७हजार २३३प्लॉट (४१.७९ टक्के) नोंदणी झाली आहे. शनिवार (ता. १३) पर्यंत एकूण १ लाख ८७ हजार २२५ हेक्टर क्षेत्राची ई पीक पाहणी झाली.शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणीसाठी रविवार (ता. १४) पर्यंतची मुदत होती. परंतु राज्याच्या विविध जिल्ह्यात अतिवृष्टी, दुबार पेरणी आदी कारणामुळे शेतकरी ई-पीक नोंदणी करू शकले नाहीत. शेतकरी ई-पीक पाहणी पासून वंचित राहू नयेत यासाठी शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणीसाठी शनिवार (ता. २०) पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.