‘‘आधुनिक तंत्रज्ञान, नवीन वाण आणि ज्येष्ठ शेतकऱ्यांचा अनुभव यांची सांगड घालून उच्च शिक्षित तरुण शेतीत उतरल्यासच शेती क्षेत्राची खरी प्रगती होऊ शकते. ही बाब केवळ द्राक्षबागांसाठीच नव्हे, तर संपूर्ण शेतीच्या भवितव्यासाठी महत्त्वाची आहे,’’ असे मत दक्षिण आफ्रिकेचे द्राक्ष तज्ज्ञ कुबोस बोत्मा यांनी येथे व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या सांगली विभागातर्फे द्राक्ष उत्पादकांसाठी आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘दक्षिण आफ्रिका आणि भारतातील हवामान काही प्रमाणात मिळते-जुळते असले, तरी जमिनीच्या गुणधर्मांमध्ये मोठा फरक आहे.
विशेषतः महाराष्ट्रातील जमिनीतील ‘ईसी’ आणि ‘पीएच’ वाढल्यामुळे द्राक्ष उत्पादनात अडचणी निर्माण होत आहेत. द्राक्ष पिकासाठी पाण्याचा वापर अत्यंत मोजून आणि नियोजनपूर्वक करणे गरजेचे आहे. जागतिक बाजारपेठेत टिकणाऱ्या द्राक्षांच्या नवीन वाणांचा अभ्यास करून ते राज्यात आणण्याची आवश्यकता आहे.
https://agrowon.esakal.com/agro-special/women-shg-tool-bank-subsidy-24-lakh-rat16