सिंधुदुर्ग जिल्ह्यात दरवर्षी गुढीपाडव्याचा मुहूर्त साधून आंबा हंगामाला सुरुवात होते. परंतु या वर्षी काही किरकोळ आंबा उत्पादकांनाच मुहूर्त साधता आल्याचे चित्र आहे. आंब्याची आवक खूपच कमी असून, हापूसला प्रति पेटी ५ ते ७ हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे.बदलत्या वातावरणाचा मोठा फटका या वर्षी आंबा पिकाला बसला. आंब्याला आलेला ९० टक्के मोहर करपला.

त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. दरवर्षी हापूस हंगामाकरिता अनेक आंबा उत्पादक गुढीपाडव्याचा मुहूर्त साधतात. परंतु ७० टक्के आंबा उत्पादकांना हा मुहूर्त साधता आला नाही, अशी माहिती येथील बागायतदारांनी दिली.वाशी मार्केटमध्ये दरवर्षी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघरसह विविध भागांतून ५० हजार आंबा पेट्या दाखल होतात. या वर्षी केवळ १० ते १५ हजार पेट्या आंबाच दाखल झाला आहे. त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंब्याचे प्रमाण हे अल्प होते. येथे आंब्याची आवक अद्यापही सुरू झाली नसल्याचे चित्र आहे.

दरम्यान, सध्या प्रति पेटी ५ ते ७ हजारांपर्यंत दर मिळत असलेला हापूस आंबा प्रति डझन १५०० ते २००० रुपयांनी विक्री केला जात आहे. आंबा उत्पादन घटल्यामुळे या वर्षी आंब्याचा वाढीव दर टिकून राहण्याचा अंदाज आहे. एप्रिलच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात सध्याच्या तुलनेत आंब्याची आवक काही प्रमाणात वाढेल, असा अंदाज आहे.

https://agrowon.esakal.com/market-intelligence/alphonso-mango-price-5000-7000-india-rat16

माहिती शेअर करा