कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी आर्थिक मदतीचे निकष निश्चित करणे आणि दीर्घकालीन उपाययोजनांसाठी कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास रस्तोगी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (ता.२५) दिले.कांदा प्रश्नाबाबत विधान भवनात आयोजित बैठकीत कांदा प्रश्न नेहमीच सतावत असतो, त्यामुळे त्यावर दीर्घकालीन उपाययोजनांची गरज व्यक्त करण्यात आली. याबाबतचा अहवाल तीन महिन्यांत द्यावा, असे निर्देश देण्यात आले.

या प्रश्नावरील तात्कालिक तोडग्यासाठी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव आणि पणन विभागाचे सचिव यांची समिती स्थापन करण्यात येईल. या समितीने शेतकऱ्यांना तातडीने करता येणाऱ्या उपाययोजना सुचवाव्यात, कांदा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी यंत्रणांनी दीर्घकालीन पर्यायांची अंमलबजावणी करावी, अशी सूचना करण्यात आली.

या बैठकीत पीक पद्धती बदलण्याबाबत पर्याय सुचविण्याचे निर्देश दिले.या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पणनमंत्री जयकुमार रावल, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ, शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे उपस्थित होते.

https://agrowon.esakal.com/agro-special/onion-farmers-relief-committee-maharashtra-fadnavis-rat16

माहिती शेअर करा