कृषी समृद्धी योजना २०२५ अंतर्गत परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नावीन्यपूर्ण योजनांचा लाभ देण्यासाठी १७ कोटी ५२ लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. या अंतर्गत महाडीबीटी पोर्टलद्वारे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर शेतकऱ्यांना लाभ देण्यात येणार आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
जिल्ह्यात कृषी समृद्धी योजनेअंतर्गत गावपातळीवर मृदा तपासणी प्रयोगशाळांसाठी ८२ लाख ५० हजार रुपये, गोदाम (२ हजार टन क्षमता) बांधकामांसाठी (स्मार्ट योजना) ४ कोटी रुपये, दहा ड्रम थियरीसाठी १ कोटी रुपये, गोदाम (२५० टन क्षमता) बांधकामासाठी (खाद्यतेल अभियान) १ कोटी ३७ लाख ५० हजार रुपये, शेळी-मेंढी पालनसाठी १० लाख रुपये,
शेतीमाल थेट विक्रासाठी फिरते वाहन विक्री केंद्र सुविधेसाठी ४५ लाख रुपये, पोर्टेबल भाजीपाला, फळविक्री स्टॉलसाठी ५ लाख रुपये, भाजीपाला, फळांची काढणीपश्चात हाताळणीकरिता प्लॅस्टिक क्रेटसाठी ९ लाख ९९ हजार रुपये, अन्नधान्य वाळविण्यासाठी ताडपत्री वितरणासाठी ९ लाख ९९ हजार रुपये, गांडूळ खत बेडसाठी १० लाख रुपये, सुपरकेन नर्सरीसाठी ५ लाख रुपये मंजूर आहेत.