सांगली जिल्ह्यात २०२५-२६ मध्ये महाडीबीटी प्रणालीद्वारे कृषी यांत्रिकीकरण योजनेतून विविध घटकांसाठी २ हजार २६७ शेतकऱ्यांना १० कोटी ६५ लाखांचे अनुदान दिले आहे. या शेतकऱ्यांनी या अंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, हार्वेस्टर, स्प्रे पंप, पॉवर टिलर, रोटाव्हेटर, पेरणी यंत्र, ड्रोन यासह इतर प्रकारची अवजारे खरेदी केली आहेत.
गेल्या पाच वर्षांत १५ हजार २५ शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून ७७ कोटी ५९ कोटींचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.कृषी विभागाकडून कृषी यांत्रिकीकरण योजना गतीने राबविण्यात येत आहे. राज्य पुरस्कृत ‘कृषी यांत्रिकीकरण’, ‘उपअभियान कृषी यांत्रिकीकरण’तर ‘आरकेव्हीवाय’ अशा योजनांमधून शेतकऱ्यांना यांत्रिकीकरणाचा लाभ मिळत आहे. यांत्रिकीकरण योजनेसाठी विविध प्रवर्गानुसार अवजारांसाठी अनुदानाची टक्केवारी ठरवून दिली आहे.
शेतकऱ्यांनी कृषी यांत्रिकीकरणाची योजनेचा लाभ घ्यावा यासाठी जनजागृतीही केली आहे. त्यामुळे शेतकरी विविध योजनेतील यांत्रिकीकरणाचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घेतला असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत १५ हजार २५ शेतकऱ्यांनी विविध योजनांसाठी लाभ घेतला आहे. या योजनेतून शेतकऱ्यांची विविध घटकांसाठी महाडीबीटी प्रणालीद्वारे निवड झाली आहे.
https://agrowon.esakal.com/agro-special/two-thousand-farmers-benefit-from-mechanization-abhi47