राज्यातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाय म्हणून नदीजोड प्रकल्प राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे पुढील पाच ते सात वर्षांत नाशिक, अहमदनगर, जळगाव व मराठवाड्याचा दुष्काळ दूर होणार आहे. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवार (ता.६) प्रवरानगर येथे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या नूतनीकरणाच्या शुभारंभप्रसंगी दिली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सहकार चळवळीतील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील व पद्मविभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या योगदानाचा गौरव करत सांगितले की, विखे पाटील यांनी महाराष्ट्रात सहकाराची पायाभरणी केली, तर बाळासाहेब विखे पाटील यांनी जलसंवर्धनाची चळवळ उभी केली.

त्यांच्याच स्वप्नपूर्तीसाठीच राज्य सरकार हा नदीजोड प्रकल्प राबवत आहे. या योजनेत विदर्भातील वैनगंगा-नळगंगा प्रकल्प, तापी खोऱ्यातील पाणी आणणे आणि उल्हास खोऱ्यातून समुद्रात जाणारे ५४ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळवणे यांचा समावेश आहे. हे पाणी टप्प्याटप्प्याने गोदावरी खोऱ्यात आणले जाईल. त्यामुळे त्या भागातील पाणीटंचाई आणि दुष्काळाची समस्या कमी होणार आहे.

https://agrowon.esakal.com/agro-special/cm-fadnavis-announces-river-linking-as-key-to-ending-water-crisis-in-maharashtra-rat16

माहिती शेअर करा