केंद्र सरकारच्या आर्थिक मदतीतून प्रत्येक जिल्ह्यात पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना (पीएमएफएमई) राबवली जात आहे. या योजनेमुळे अनेकांना रोजगार मिळत असून कच्च्या मालावर प्रक्रिया करून अधिक नफा मिळविण्याची संधी उपलब्ध होत आहे. याचा जिल्ह्यातील शेतकरी तसेच ग्रामीण भागातील युवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे यांनी केले आहे.

जिल्ह्यात वाढत्या बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर शिक्षित युवकांना उद्योग उभारण्यास भांडवलाची अडचण भासत होती. मात्र, केंद्र शासनाने सुरू केलेल्या पीएमएफएमई योजनेमुळे उद्योग उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या योजनेत बेरोजगार, बचत गट, शेतकरी गट, संस्था, तसेच अॅग्रो कंपन्यांनाही अर्ज करता येणार आहे.

विशेष म्हणजे, शासन एकूण कर्जावर ३५ टक्के अनुदान देत आहे, ज्यामुळे जिल्ह्यातील विविध संस्था, गट आणि इच्छुकांना मोठ्या प्रमाणावर मदत मिळत आहे. जिल्ह्यात प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यात येत आहे. पीएमएफएमई योजनेअंतर्गत मागील आर्थिक वर्षात व चालू आर्थिक वर्षांत जिल्ह्यात ४८१ प्रस्ताव मंजूर झाले असून ३८५ उद्योग प्रत्यक्षात सुरू झाले आहेत.

https://agrowon.esakal.com/agro-special/come-forward-for-the-food-processing-industry-in-the-pmfme-scheme-abhi47

माहिती शेअर करा