राज्यातील फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या फळाची गुणवत्ता सुधारावी, त्याचे संरक्षण व्हावे, यासाठी फळाच्या प्रोटेक्शन बॅगसाठी राज्य सरकार अनुदान देणार असल्याची माहिती कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी अरण (ता. माढा) येथे दिली. कृषिमंत्री कोकाटे हे नुकतेच अरण येथे आले होते. येथील शेतकरी दत्तात्रय घाडगे यांनी शरद व सावता या दोन नव्या आंब्याच्या जाती विकसित केल्या आहेत, त्याला पेटंटही मिळाले आहे.

या फळबागेची त्यांनी पाहणी केली. त्यांनी एकाच आंब्याच्या झाडाला सतरा प्रकारचे अंबे येणार असल्याचे सांगितले, हे विकसित केलेले सेंद्रिय व होमिओपॅथिक तंत्रज्ञानाने पिकवलेले वाण पाहत कृषिमंत्री कोकाटे यांनी त्यांचे कौतुक केले. यावेळी घाडगे यांनी आम्ही डाळिंब, पेरूप्रमाणे, आंब्याच्या फळाचे उन्हापासून संरक्षण व्हावे, यासाठी प्रोटेक्शन बॅग (फळ सुरक्षा पिशवी) वापरल्याने फळाची उत्तम गुणवत्ता चांगली मिळाल्याचे मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

त्यानंतर या पद्धतीच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्याबाबत त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. या वेळी माजी समाजकल्याण सभापती शिवाजी कांबळे, माजी जी प सदस्य भारत शिंदे, मंदाकिनी घाडगे, गजानन घाडगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, जिल्हा विकास अधिकारी हरिदास हावळे, उपविभागीय कृषी अधिकारी संजय वाकडे, तालुका कृषी अधिकारी अविनाश चंदन, मंडल कृषी अधिकारी संजय पाटील उपस्थित होते.

https://agrowon.esakal.com/agro-special/state-government-to-subsidize-fruit-protection-bags-for-quality-improvement#goog_rewarded

माहिती शेअर करा