हवामान बदल, बाजारपेठेतील अस्थिरता तसेच शेतीविषयक अचूक माहितीत होणाऱ्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या सर्व समस्यांवर प्रभावी उपाय म्हणून कृषी विभागाने विकसित केलेले महाविस्तार एआय हे आधुनिक मोबाईल ॲप शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे, त्याचा वापर करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

महाविस्तार एआय ॲप हे शेतकऱ्यांच्या शेतीशी संबंधित सर्व गरजा पूर्ण करणारे एक प्रभावी डिजिटल व्यासपीठ आहे. मराठी भाषेत उपलब्ध असलेले हे ॲप शेतकऱ्यांना रिअल टाइम हवामान अंदाज, बाजारभाव, कृषी तज्ज्ञांचा सल्ला तसेच आधुनिक शेती पद्धतींचे मार्गदर्शन एका क्लिकवर उपलब्ध करून देते. एआय चॅटबॉटद्वारे शेतकऱ्यांच्या प्रश्नांना त्वरित उत्तरे मिळतात. स्थानिक हवामान अंदाजामुळे पेरणी, कापणी व खतांचा योग्य वापर नियोजनबद्ध करता येतो.

बाजारभावाची अद्ययावत माहिती, विविध कृषी योजना, अनुदान व पीक विमा योजनांची सविस्तर माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होते. मराठीत व्हिडिओ स्वरूपातील मार्गदर्शनामुळे लागवड, खत व्यवस्थापन, कापणी तसेच जैविक शेतीविषयक माहिती मिळते. पिकांचे फोटो अपलोड करून रोग व किडींचे निदान करून त्यावरील उपायही शेतकऱ्यांना मिळू शकतात.

https://agrowon.esakal.com/agro-special/use-mahavistar-ai-for-all-the-needs-of-farmers-abhi47

माहिती शेअर करा