सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत प्रक्रिया उद्योग व पूरक व्यवसाय स्वीकारावेत. त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास उत्पन्नात लक्षणीय वाढ होऊ शकते. मित्रा कंपनी व सांगली जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमानाने शेतमालाच्या ई-मार्केटिंगसाठी कार्यवाही सुरू झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील ई-मार्केटिंगच्या माध्यमातून दर्जेदार शेतीमालाला देशभरातील बाजारपेठ उपलब्ध होणार असल्याचा विश्वास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात मित्रा कंपनी व सांगली जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन प्लॅटफॉर्मसह खरेदीदार-विक्रेता मेळावा शुक्रवारी (ता. २७) पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार,पालकमंत्री पाटील म्हणाले, की शेतकऱ्यांचे दरडोई उत्पन्न वाढून तो आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे. त्याला गरजांसाठी इतरांवर अवलंबून राहण्याची किंवा कर्ज घेण्याची वेळ येऊ नये, असा समृद्ध शेतकरी निर्माण करणे आवश्यक आहे. या दृष्टीने जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी राबविलेला उपक्रम उल्लेखनीय आहे.

https://agrowon.esakal.com/agro-special/sangli-farmers-agri-processing-income-rat16

माहिती शेअर करा