राज्यात पुढील ५ दिवस पावसाला पोषक हवामान आहे. तर दोन दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपीटीचाही इशारा देण्यात आला आहे. आजपासून पुढील ४ दिवस राज्यभरात वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आज राज्यातील काही भागात गारपीट आणि पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. आज नाशिक, अहिल्यानगर, बीड, सोलापूर, लातूर, धाराशिव, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागात वादळी पावसासह गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे.

तर पुणे, सातारा, जळगाव, नंदूरबार, धुळे, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलडाणा, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, अकोला, अमरावती, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता आहे. तर इतर जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानाचा अंदाज देण्यात आला आहे. उद्या पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, अहिल्यागर, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात गारपीटीचा अंदाज देण्यात आला आहे. तर विदर्भातील नागपूर, वर्धा, यवतमाळ, भंडारा, गोंदीया, चंद्रपूर, गडचिरोली, लातूर, धाराशिव, नांदेड, कोल्हापूर, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड आणि ठाणे जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज आहे.

बुधवारी संपूर्ण मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भातील वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात वादळी पावासाचा अंदाज देण्यात आला आहे. तर गुरुवारी संपूर्ण विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. शुक्रवारी ढगाळ वातावरण राहून पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. असाही अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 

https://agrowon.esakal.com/weather-news/hail-forecast-for-two-days-weather-conducive-to-rain-in-the-state-for-the-next-5-days

माहिती शेअर करा