राज्यातील शेतकरी, शेती हा राज्य सरकारच्या प्राधान्यक्रमातील महत्वाचा घटक आम्ही मानलेला आहे. म्हणूनच अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी ९ हजार ७०० कोटींची भरीव तरतूद केली आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) वापरला प्राधान्य दिल्याने कृषी क्षेत्रासाठी हा प्रयत्न नवसंजीवनी ठरेल, असा आशावाद उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेवरील उत्तरादरम्यान व्यक्त केला. दरम्यान, सम्रुद्धी महामार्गाला प्रचंड विरोध होता. मात्र, पाचपट नुकसान भरपाई दिल्यानंतर तो मावळला शक्तीपीठ महामार्गाबाबतीतहि तसेच होईल, असे सुचोवाचही त्यांनी केले.
अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान विरोधकांनी केलेल्या आरोपांना पवार यांनी उत्तर देत जाहीरनामा हा पाच वर्षासाठी असतो. त्यामुळे आम्ही आर्थिक शिस्त पाळत अर्थसंकल्प मांडला आहे.

https://agrowon.esakal.com/agro-special/artificial-intelligence-to-drive-growth-in-agriculture-sector

माहिती शेअर करा