भारतीय हवामान विभागाने पुण्यात देशातील पहिले पूर्णतः डिजिटल हवामान निरीक्षण केंद्र सुरू केले आहे. या नव्या प्रणालीमुळे हवामानाचा अधिक अचूक, तत्काळ आणि विश्वासार्ह अंदाज मिळणार असल्याची माहिती हवामान विभागातील सूत्रांनी दिली.हवामान विभागाने पारंपरिक पृष्ठभागीय निरीक्षण यंत्रणेत डिजिटल पृष्ठभागीय हवामान निरीक्षण प्रणालीचा समावेश केला आहे. ही प्रणाली पुण्यातील पृष्ठभागीय उपकरण विभागात विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीत वायरलेस संकेतांवर आधारित डिजिटल संवेदकांचा वापर करण्यात येतो.

ही प्रणाली पुण्यातील पृष्ठभागीय उपकरण विभागात विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीत वायरलेस संकेतांवर आधारित डिजिटल संवेदकांचा वापर करण्यात येतो. त्याद्वारे तापमान, आर्द्रता, वायुदाब, वाऱ्याचा वेग आणि पर्जन्यमान यांचे अचूक मोजमाप केले जाते. या नव्या प्रणालीमुळे पाऱ्यावर आधारित उपकरणांचा वापर टप्प्याटप्प्याने बंद केला जाणार आहे.

मिनामाता कराराचे पालन

मिनामाता कराराअंतर्गत पाऱ्याच्या वापरावर निर्बंध आणण्याच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे ही प्रणाली पर्यावरणपूरक आणि सुरक्षित आहे. ही प्रणाली अवघ्या ६ महिन्यांत विकसित करण्यात आली असून, एनएबीएल प्रमाणन, आवश्यक चाचण्या, कॅलिब्रेशन आणि मूल्यांकनानंतर नेटवर्कमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. त्याचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर दोन्ही पूर्णपणे स्वदेशी आहेत. ही संपूर्ण प्रणाली स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित असून, ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘डिजिटल भारत’ उपक्रमाला बळ देणारी आहे. कमी खर्चात विकसित झाल्यामुळे ती देशभरात सहजपणे राबवता येणार आहे, असे हवामान विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

https://agrowon.esakal.com/weather-news/hail-forecast-for-two-days-weather-conducive-to-rain-in-the-state-for-the-next-5-days

माहिती शेअर करा