नाशिक जिल्ह्याच्या विविध भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस व काही भागांत झालेल्या गारपिटीमुळे रब्बी हंगामातील गहू, कांदा, डाळिंब, भाजीपाला व द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. बुधवारी जिल्ह्यात जवळपास ३० गावांमध्ये १३०० हेकटर क्षेत्रावर सुमारे २ हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक कांदा पिकाचे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला आहे.
https://agrowon.esakal.com/agro-special/hailstorm-hits-nashik-crops-on-1200-hectares-destroyed-rat16