केंद्र सरकारने रब्बी हंगाम २०२५-२६ साठी फॉस्फॅटिक आणि पोटॅशिक (पी अॅण्ड के) खतांसाठी नवीन अनुदान दर निश्चित केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी (ता.२८) खत विभागाच्या या प्रस्तावाला मंजूर देण्यात आली.

रब्बी हंगामासाठी ३७ हजार ९५२ कोटी २९ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मागील खरीप हंगामाच्या तुलनेत ७३७ कोटी रुपयांनी हा निधी जास्त असल्याचा केंद्र सरकारचा दावा आहे. पोषण तत्व आधारित खतांचे दर  १ ऑक्टोबर २०२५ ते ३१ मार्च २०२६ या काळासाठी निश्चित करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा खतांवरील खर्च कमी करण्यासाठी आणि शेती क्षेत्र बळकट करण्यासाठी मदत होईल. तसेच देशातील शेती अधिक टिकाऊ आणि उत्पादनक्षम होईल, असा विश्वासही खत विभागाने व्यक्त केला आहे. 

https://agrowon.esakal.com/agro-special/union-cabinet-approves-nutrient-based-subsidy-nbs-rates-for-rabi-season-2025-26

माहिती शेअर करा