रेशीम उद्योग हा कुटीर उद्योग असून त्यातून गाव खेड्यात रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात होते. राज्यातील शेतकऱ्यांना नानासाहेब देशमुख कृषि संजीवनी (पोकरा) योजनेच्या अंतर्गत वर्षात एकरी २ लाख २९ हजार तर मनरेगा योजनेच्या अंतर्गत रेशीम शेतकरी गटातून एकरी ३ लाख ५५ हजार अनुदान देण्यात आले. उद्योगासाठी पक्क्या संगोपनगृहाची आवश्यकता असते. म्हणून शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून राज्यात संगोपन गृहासाठी अनुदान दिले जाते. रेशीम उद्योग शाश्वत शेतीला पुरक असा व्यवसाय आहे.

रेशीम उद्योगात करताना काही गोष्टी समजून घ्याव्या लागतात. रेशीम कीटक हे चार प्रकारचे असतात. तुती रेशीम, इरी रेशीम, टसर रेशीम आणि मुगा रेशीम कीटक. तुती रेशीमवर भारतातील प्रमुख रेशीम उत्पादन आधारित आहे. विशेषत: महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेशात याचे उत्पादन घेतले जाते. तुती झाडाचा पाला रेशीम कीटक अन्न म्हणून खातात. इरी रेशीमला अहिंसा (Ahimsa) सिल्क म्हणूनही ओळखले जाते. ते रिठा, पांगारा आणि एरंडाची पाने खातात आणि आसाम, मेघालय, मणिपूरमध्ये त्याचे उत्पादन घेतले जाते.

टसर रेशीम हे मजबूत किंचित खरखरीत आणि तांबूस सोनसळी रंगाचे असते. या रेशीमचा वापर पारंपरिक पोशाखांमध्ये केला जातो. जंगलातील झाडांवर नैसर्गिकरीत्या त्याचे कोष वाढतात. झारखंड, छत्तीसगड आणि महाराष्ट्रात याचे उत्पादन घेतले जाते. मुगा रेशीम हे नैसर्गिकरीत्या सोनेरी- पिवळसर आणि चमकदार असते परंतु त्याचे उत्पादन फक्त आसाममध्येच घेतले जात. ही कीड सोम आणि सोआलूची पाने खाते. हे रेशीम अत्यंत टिकाऊ आणि महागडे असते.

https://agrowon.esakal.com/krishi-salla/how-to-start-a-silk-industry-learn-complete-information-article-on-agrowon-ssp-25

माहिती शेअर करा