राज्यातील वादळी पावसाने उघडीप देताच, उन्हाचा चटका वाढू लागला आहे. आज (ता. ७) पूर्व विदर्भातील चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) आहे. तर उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

ईशान्य विदर्भ आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत असून, त्यापासून उत्तर प्रदेशपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. सोमवारी (ता. ६) सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांमध्ये आंध्र प्रदेशातील तिरूपती येथे देशातील उच्चांकी ४०.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर उत्तर प्रदेशातील हरदोई, नजीबाबाद आणि हरियाणाच्या कर्नाल येथे नीचांकी १४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

अंशतः ढगाळ हवामान होत असल्याने राज्याच्या तापमानात चढ-उतार होत आहे. किमान तापमानात काही अंशी घट झाल्याने काही ठिकाणी रात्री गारठा जाणवू लागला आहे. सोमवारी (ता. ६) सोलापूर आणि अकोला येथे राज्यातील उच्चांकी ३७.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १३.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

https://agrowon.esakal.com/weather-news/temperature-rise-heatwave-forecast-india-rat16

माहिती शेअर करा