कृषी क्षेत्रातील हवामानाधारित नियोजन अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारकडून ‘मिशन मौसम टप्पा दोन’ अंतर्गत पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या वतीने देशभरात किमान २०० स्वयंचलित कृषी हवामान केंद्रे उभारण्याची योजना आखली आहे. २०२६ अखेरपर्यंत ही केंद्रे कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट असून, त्यापैकी ११ केंद्रे महाराष्ट्रातील विविध ठिकाणी उभारली जाणार आहेत, अशी माहिती भारतीय हवामान विभागातील सूत्रांनी दिली आहे.

नव्याने उभारण्यात येणारी ही स्वयंचलित केंद्रे पर्जन्यमान, तापमान, आर्द्रता, तसेच वाऱ्याचा वेग आणि दिशा यांचा ‘रिअल टाइम’ डेटा उपलब्ध करून देतील. त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीची वेळ, सिंचनाचे नियोजन आणि पिकांची निवड याबाबत अधिक अचूक निर्णय घेता येणार आहेत.

तांत्रिकदृष्ट्या अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असलेली ही केंद्रे हवामान अंदाज अधिक सक्षम आणि विश्वासार्ह असतील. या योजनेअंतर्गत विविध राज्यांमध्ये केंद्रे उभारण्याचे नियोजन करण्यात आले असून, उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक ३६ केंद्रे उभारली जाणार आहेत.

https://agrowon.esakal.com/agro-special/india-200-agri-weather-stations-rat16

माहिती शेअर करा