जागतिक हवामानासह पर्जन्यमानावर प्रभाव पाडणारा ‘एल निनो’ वेळेच्या आधीच येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागासह जगभरातील सर्व प्रमुख हवामान संस्थांच्या निरीक्षणांनुसार प्रशांत महासागरातील पाण्याच्या तापमानात सतत वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. त्यानुसार मे ते जुलै या तीन महिन्यांच्या कालावधीत एल निनो येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

यंदा एल निनो येण्याची शक्यता पूर्वीच वर्तविण्यात आली आहे. मात्र तो कधी येणार यावरून हवामान प्रारूपे वेगवेगळे अंदाज दर्शवीत आहेत.काही हवामान प्रारूपे एल निनोची स्थिती लवकर सुरू होईल, असे दर्शवितात, तर काही त्याची स्थिती हळूहळू निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करीत आहेत. जागतिक हवामानातील महत्त्वाचा घटक असलेल्या संकेत एन्सोच्या (एल निनो सदर्न ऑसिलेशन) उष्ण टप्प्याचे पुनरागमन या वर्षाच्या उत्तरार्धात होण्याची शक्यता जास्त आहे. तर अल्पकालीन अंदाजानुसार, जगभरात सरासरीपेक्षा जास्त तापमान कायम राहण्याची शक्यता आहे.

ऑस्ट्रेलिया हवामान विभागाच्या मते, सध्या एन्सो स्थिती तटस्थ आहे, पण तापमान वाढीची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. प्रशांत महासागरातील तापमान मोजण्याचे महत्त्वाचे परिणाम निनो इंडेक्स ३.४ हे एप्रिल मध्यापर्यंत उणे ०.२७ अंश सेल्सिअस होता. म्हणजेच तटस्थ अवस्थेत होता.

https://agrowon.esakal.com/agro-special/early-el-nino-impact-india-monsoon-abhi47

माहिती शेअर करा