शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. कर्जमाफीसाठी ३० जून तारीख दिली आहे. पण ३० जूनपर्यंत थांबण्याची गरज नाही. त्याच्याअगोदरच २ लाखांपर्यंत कर्जमाफी होईल, असे कृषिमंत्री भरणे यांनी सोमवारी (दि. २० एप्रिल) सांगितले. राज्यातील शेतकऱ्यांची ३० जून २०२६ पूर्वी कर्जमाफी होईल, अशी घोषणा याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. पण त्याआधीच लवकरच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे संकेत कृषिमंत्र्यांनी दिले आहेत.

खरीप हंगामाच्या नियोजनासाठी आज पुण्यात संपूर्ण राज्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची कार्यशाळा आयोजित केली होती. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, यंदाच्या मान्सून हंगामात ‘एल निनो’चा प्रभाव राहणार आहे. ‘मे’च्या शेवटच्या आठवड्यात खरा अंदाज समोर येईल. ‘एल निनो’चा परिणाम खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. पावसाचे प्रमाण कमी राहील. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना ज्या अडचणींना सामोरे जावे लागेल, त्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत. यावर कार्यशाळेत चर्चा झाल्याचे भरणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

https://agrowon.esakal.com/agro-special/farm-loan-waiver-before-june-30-says-agriculture-minister-dattatray-bharane-ddb79

माहिती शेअर करा