कृषी क्षेत्राला कृत्रिम बुद्धिमत्तेची (एआय) जोड देऊन उत्पादनवाढ साधता येईल आणि त्या शेतीमालाला उत्तम बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास शेतीसाठी भविष्यात अधिक चांगले दिवस येतील, यासाठी कृषी विद्यार्थ्यांनी प्रयोगशील शेती व आधुनिकीकरणाची कास धरावी, असे प्रतिपादन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

पुणे कृषी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेचा ३८ वा वर्धापनदिन कार्यक्रम सोमवारी (ता. १३) महाविद्यालयातील शिरनामे सभागृह येथे घेण्यात आला होता. त्यावेळी श्री. भरणे बोलत होते. या वेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष शेखर गायकवाड, उपाध्यक्ष हनुमंत मोहिते, प्रा. डॉ. जनार्दन कदम, कृषी विभागाचे माजी सचिव नानासाहेब पाटील, पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. महानंद माने, सचिव अतुल मारणे, अनिल महामुलकर आदी उपस्थित होते.

यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. दरम्यान, या शेतकऱ्यांनी भोकर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीजया चव्हाण यांची भेट घेऊन या विषयाशी त्यांना अवगत केले. त्यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याशी चर्चा केली.तसेच विधानसभेत व राज्य शासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. शेतकरी प्रतिनिधी तथा नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नीलेश देशमुख (बारडकर) यांनी मुंबईत झालेल्या शासकीय बैठकीत या विषयावर ठोस पुराव्यांसह मांडणी करत शेतकर्‍यांचा दावा न्याय्य असल्याचे स्पष्ट केले.

या वेळी माजी विशेष पोलिस महानिरीक्षक सुरेश खोपडे यांना कृषी जीवन गौरव पुरस्कार, तर माजी सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. रामचंद्र साबळे, नांदेड कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख प्रमोद देशमुख, सचिन भालिंगे यांना कृषी सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुरस्काराचे सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि शाल असे स्वरूप होते.

https://agrowon.esakal.com/agro-special/ai-in-agriculture-smart-farming-india-students-rat16

माहिती शेअर करा