प्रधानमंत्री खरीप पीकविमा योजनेला खानदेशात यंदा कमी प्रतिसाद मिळाला आहे. परतावे न मिळणे, विमा कंपनीची मनमानी व परिमाणके बदलून उंबरठा उत्पादन हा निकष ठेवल्याने या योजनेकडे यंदा अनेकांनी पाठ फिरविल्याची स्थिती आहे. यंदा फक्त उंबरठा उत्पादन हे परिमाणक या पीकविमा योजनेसंबंधी आहे.

मागील वेळेस एक रुपयात पीकविमा योजनेत काढणीपूर्व, काढणीपश्चात नुकसान, पाऊस आदी बाबींत नुकसानीसंबंधी परतावे देय होते. परंतु या योजनेतून मागील वेळेस परतावे अनेकांना मिळाले नाहीत.  ओला दुष्काळ होता. परंतु उंबरठा उत्पादनाचा निकष व अन्य परिमाणकांमुळे कापूस, सोयाबीन व अन्य पिकांसंबंधी नुकसान होवूनही परतावे मिळाले नाहीत. शासन या योजनेचा गवगवा करते, परंतु भरपाई मिळत नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

https://agrowon.esakal.com/agro-special/farmers-lose-faith-in-pm-crop-insurance-scheme-in-khandesh-mj18

माहिती शेअर करा