सद्यःस्थितीत भारतामध्ये सौर ऊर्जेचा वापर वाढत असून, पर्यावरणाचा समतोल राखून पारंपारिक ऊर्जेला हा एक मोठा पर्याय ठरत आहे. महानिर्मिती सोबत करार करून शेतकऱ्यांना एक शाश्वत उत्पन्नाचा स्रोत प्राप्त झाला आहे. म्हणूनच जर आपण सौर शेतीचा पर्याय निवडला तर दोन्ही गोष्टी साध्य करून घेता येणे आता शक्य आहे. सौर शेती म्हणजेच ॲग्रो व्होल्टाइक्स. हे एक असे तंत्रज्ञान आहे ज्यामध्ये शेतकऱ्याला पिके घेऊनही वीज निर्मितीला हातभार लावता येणे शक्य आहे. १९८१ मध्ये अडॉल्फ गोएट्बर्गर आणि आर्मीन झास्ट्रो यांनी हे तंत्रज्ञान सादर केले.

२००४ मध्ये जपानमध्ये छोट्या रूपात आणि २०२२ मध्ये पूर्व आफ्रिकेत विविध चाचण्यानंतर वापरण्यास सुरुवात झाली. सध्या भारत, अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन आणि जर्मनी या देशात याचा यशस्वीरीत्या वापर केला जात आहे. भारताचा विचार करता अद्यापही हे तंत्रज्ञान सुरुवातीच्या टप्प्यात आहे. पूर्ण सौर प्रकल्पासाठी जिथे पिके घेतली जात नाहीत अशा ओसाड जमिनीचा वापर करणेच योग्य आहे.

सौर शेतीमध्ये सौर पॅनेल जवळच्या किंवा खालच्या जागेत पीक लागवड करता येते. या प्रकारच्या शेतीमध्ये सर्व पिके घेता येत नाहीत. सौर शेती जमीन आधारित प्रणाली असून एका मेगावॉट वीज निर्मिती निर्मितीसाठी सुमारे दोन हेक्टर जमीन आवश्यक आहे. पावसाळ्यामध्ये जेव्हा आकाश ढगाळ असते तेव्हा शेतकऱ्यांना पर्यायी ऊर्जा स्रोत वापरावे लागू शकतात. सौर पॅनेलमुळे पिकावर सावली येत असल्याने काहीवेळा वनस्पतींवर किडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे पिकाची योग्य देखभाल करणे गरजेचे ठरते. 

https://agrowon.esakal.com/agro-special/agrivoltaics-dual-income-model-for-indian-farmers-sai29

माहिती शेअर करा