भारत – न्यूझीलंडदरम्यान झालेल्या मुक्त व्यापार करारामध्ये एकीकडे भारतीय शेतकऱ्यांच्या हितांचे संरक्षण करताना दुसरीकडे निर्यातीस मोठ्या संधी उपलब्ध कपून देण्यात आल्या आहेत. या करारानुसार भारताच्या शेती व डेअरी क्षेत्राला संरक्षण देण्यात आले आहे.

तसेच, न्यूझीलंडमधील शेतकऱ्यांना भारताच्या बाजारपेठेत मर्यादित आणि नियंत्रित प्रवेश देण्यात आला आहे. सफरचंद, किवी फळ, मनुका, मध आणि अल्ब्युमिन्स यांसारख्या निवडक उत्पादनांनाच प्रवेश मिळणार असून, तो टॅरिफ रेट कोटा (टीआरक्यू), किमान आयात किंमत आणि हंगामी निर्बंधांच्या चौकटीतच असेल. याशिवाय लोकर, मेंढीचे मांस, कच्ची कातडी, वन्य उपज पदार्थ, मत्स्य व्यवसाय आणि वाइन क्षेत्रातही मर्यादित प्रवेश मिळणार आहे.

दुसरीकडे, भारतीय शेतकऱ्यांसाठी न्यूझीलंडच्या बाजारपेठेत पूर्णपणे शुल्कमुक्त प्रवेशाची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे ड्राय कांदा, प्रक्रिया केलेला भाजीपाला, धान्ये, खाद्यतेले, पशुखाद्य, मसाले, चहा, बासमती तांदूळ, कॉफी, हळद, मखाना, लिची आणि सागरी उत्पादने यांसारख्या निर्यातीस मोठी चालना मिळणार आहे.

https://agrowon.esakal.com/agro-special/agriculture-dairy-sector-protection-india-rat16

माहिती शेअर करा