कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्याला जागतिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये व्हावा. महाराष्ट्र कृषी-कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) धोरणांतर्गत जागतिक कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूकदार शिखर संमेलन परिषद २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी मुंबईत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित करण्यात आली आहे.

श्री. भरणे म्हणाले, की एआय फॉर ॲग्री ही परिषद वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, एफएओ, युएनडीपी, आयएफएडी, वर्ल्ड बँक समूह, आशियायी विकास बँक (एडीबी), इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर दी सेमी ॲरिड ट्रापिक्स (आयसीआयएसएटी), भारतीय विज्ञान संस्था (आयआयएससी), एम. एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन या जागतिक व राष्ट्रीय भागीदारांच्या सहकार्याने आयोजित केली जात आहे.

महाकृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण २०२५-२०२९ कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या माध्यमातून डेटा-आधारित परिसंस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने, शासनाने महाकृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण २०२५-२०२९ जाहीर केले आहे. हे धोरण कृषी आणि संलग्न क्षेत्रांमध्ये ‘एआय’चा शेतीमध्ये वापर करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे.

https://agrowon.esakal.com/agro-special/global-ai-in-agriculture-summit-in-mumbai-sai29

माहिती शेअर करा