जागतिक पातळीवरील हवामान सुधारणांसाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत. गेल्या १० वर्षांत केलेल्या अभ्यास, संशोधनाचे सकारात्मक परिणाम समोर येत आहेत. यातील १०५ संशोधन प्रबंधांमधून सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म अभ्यास समोर आला आहे. यातून आणखी सूक्ष्म संशोधनासाठी मात्र आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरातून आणखी अचूक अंदाज देण्याची यंत्रणा उभारली जाईल, अशा विश्वास जागतिक हवामान संघटनेचे अध्यक्ष डॉ. अब्दुल्ला मॅंडोस यांनी व्यक्त केला.
आयआयटीएम येथे रविवारी (ता. २) जागतिक हवामान संघटनेच्या वतीने आयोजित ११ व्या हवामान सुधारणा या शास्त्रीय परिषदेच्या उद्घाटनपर भाषणात डॉ. मँडोस बोलत होते. या वेळी केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन, भारतीय हवामान विभागाचे सहायक सरव्यवस्थापक डॉ. एम. मोहापात्रा, ‘आयआयटीएम’चे संचालक डॉ. सूर्यचंद्र राव, ऑस्ट्रेलियाचे शास्त्रज्ञ डॉ. स्टीव्हन सॅमस्, दक्षिण आफ्रिकेच्या संशोधक एस्टर्जी कॉमिंग, अमेरिकेच्या संशोधक डॉ. सराह टॅंसॅड ऑफ, परिषद आयोजन समितीच्या अध्यक्षा डॉ. थारा प्रभाकरन आदी मान्यवर उपस्थित होते.
https://agrowon.esakal.com/agro-special/accurate-weather-forecasting-system-through-ai