राज्य सरकारने शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस, गारपीट अशा नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण देण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत पिकांसाठी प्लॅस्टिक कव्हर अनुदान योजना सुरु केली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना प्लॅस्टिक कव्हर बसवण्यासाठी लागणाऱ्या खर्चाच्या ५० टक्के रक्कम सरकारकडून अनुदान म्हणून मिळणार आहे.
योजनेचे उद्देश
गारपीट आणि अवकाळी पावसासारख्या नैसर्गिक आपत्तींपासून पिकांचे संरक्षण करणे, शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे उत्पादन घेण्यासाठी आर्थिक मदत देणे आणि ग्रामीण तरुणांना शेतीत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी देणे, हे या सरकारी योजनेचे मुख्य उद्देश आहेत.