मे महिन्यात मॉन्सूनपूर्व व मॉन्सूनच्या पावसाने चांगलीच दाणादाण उडवली होती. यामुळे पुरंदर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यामध्ये तालुक्यातील ३८३ हेक्टर वरील विविध फळ आणि पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे १३९४ शेतकरी बाधित झाले आहेत. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी सूरज जाधव यांनी दिली आहे.पुरंदर तालुक्यात १५ मे नंतर पाऊस सुरु झाला तर २० मे नंतर मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

यामध्ये अंजीर, सीताफळ, कांदा तसेच विविध तरकारी आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी केली होती. तसेच संपूर्ण राज्यात हीच परिस्थिती असल्याने शासनाने तातडीने सर्व राज्यातील पंचनामे नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते.  अतिवृष्टीने नुकसान झालेल्या क्षेत्रामध्ये ६१. ७१ हेक्टर क्षेत्र जिरायती असून यामध्ये १०७ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे ३५४. ६१ हेक्टरक्षेत्र बागायती असून ७६१ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तर ३८. ७० हेक्टर क्षेत्रावरील फळबागांचे नुकसान झाल्याने ७९ शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे.

https://agrowon.esakal.com/agro-special/383-hectares-of-crops-damaged-due-to-rain-in-purandar-taluka-sai29

माहिती शेअर करा