मातीची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि शेतीमध्ये खर्च कमी करण्यासाठी शून्य मशागत पद्धत ओळखली जाते. मात्र ही पद्धत जमीन आणि पिकाच्या प्रकारावर अवलंबून असते. त्यामुळे शून्य मशागत फायदेशीर असली तरी करताना जमिनीचा प्रकार आणि पिकांची निवड यांचा विचार करणे अत्यावश्यक आहे.

शून्य मशागतीचे फायदे

शून्य मशागतीमुळे मातीतील सेंद्रिय कर्ब वाढतो.

मातीची रचना सुधारते आणि ओलावा टिकून राहतो.

नत्र, स्फुरद, पालाश यांसारखी अन्नद्रव्ये पिकांना सहज उपलब्ध होतात.

मशागतीचा खर्च, ट्रॅक्टर आणि डिझेलचा वापरही कमी होतो.

सर्वच जमिनीत शून्य मशागत करणे योग्य नाही. क्षारपड, चोपण, मुरमाड, चिकण आणि भारी काळ्या जमिनीत ही पद्धत उपयोगी ठरत नाही. अशा जमिनीत खोल नांगरणी करून माती मोकळी करणे आवश्यक असते. विशेषतः काळी जमीन पावसात चिकट होते आणि कडक बनते, त्यामुळे मशागत न केल्यास मुळांची वाढ व्यवस्थित होत नाही.

पिकांच्या बाबतीतही शून्य मशागतीची मर्यादा आहे. ऊस, कापूस, हळद यांसारख्या खोल मुळांच्या पिकांसाठी माती भुसभुशीत आणि मोकळी असणे गरजेचे असते. त्यामुळे या पिकांमध्ये शून्य मशागत योग्य ठरत नाही. विशेषतः हळदीसारख्या कंद पिकांमध्ये माती सैल नसेल तर थेट उत्पादनावर परिणाम होतो.

https://agrowon.esakal.com/agro-special/zero-tillage-really-profitable-crop-soil-matters-ssp-25

माहिती शेअर करा