अतिवृष्टी, बदलते वातावरण आणि नैसर्गिक संकटाच्या तडाख्यात जिल्ह्यातील डाळिंब बागा अडचणीत सापडल्या होत्या. त्यामुळे काही काळ डाळिंब निर्यात मंदावली होती. मात्र कृषी विभागाने निर्यात वाढीसाठी विविध कार्यक्रम राबविले. त्यामुळे जिल्ह्यातील डाळिंब व डाळिंब दाण्यांच्या निर्यातीला पुन्हा गती मिळत आहे.
२०२५-२६ या आर्थिक वर्षात ५८९ टन निर्यात झाली आहे. तर २४-२५ च्या तुलनेत मागील वर्षात २५० टनांनी वाढ झाली आहे. जिल्ह्यात डाळिंबाचे क्षेत्र सुमारे नऊ हजार हेक्टर इतके आहे. जिल्ह्यातील प्रामुख्याने आटपाडी तालुक्यातील सर्वाधिक डाळिंब क्षेत्र असून त्याखालोखाल जत तालुक्याचा क्रमांक लागतो.

https://agrowon.esakal.com/agro-special/ethanol-petrol-e25-blending-india-policy-2025-abhi47

माहिती शेअर करा