राज्यात निर्यातीच्या केळीची आवक वाढली आहे. आखातासह इतर भागांत रोज ४५ ते ५५ कंटेनर (एक कंटेनर २० टन क्षमता) केळीची पाठवणूक सुरु आहे. मात्र निर्यातीस चालना मिळाल्याने स्थानिक बाजारात पोकळी तयार होत आहे.
देशात आंध्र प्रदेशातून निर्यातीची केळी कमी उपलब्ध होत आहे. पण तामिळनाडू भागांतूनही रोज १० ते १५ कंटेनर केळीची निर्यात होत आहे. निर्यातीच्या केळीचे दर सध्या प्रति क्विंटल १८०० ते २१०० रुपये असे आहेत. राज्यात सोलापूर व लगतच्या भागांतून रोज ३० ते ३५ कंटेनर केळीची निर्यात परदेशात होत आहे.
https://agrowon.esakal.com/agro-special/ethanol-petrol-e25-blending-india-policy-2025-abhi47