आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्राच्या उभारणीसाठी ५०२ कोटी रुपयांचा निधी देण्याची शिफारस महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने केली.कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता.१८) कृषी परिषदेच्या झालेल्या १२३ व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

परिषदेचे उपाध्यक्ष तुषार पवार, अशासकीय सदस्य विनायक काशीद, महासंचालक राहुल महिवाल, शिक्षण संचालक डॉ. किशोर शिंदे, संशोधन संचालक डॉ. विकास लोंढे, विस्तार संचालक प्रकाश सानप, प्रशासन सहसंचालक आरती भोसले, वित्त सहसंचालक रूपाली कोळी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. आर्थिक काटकसरीचा भाग म्हणून कृषी सचिव, उपसचिव, सर्व विद्यापीठांचे कुलगुरू व कुलसचिव या बैठकीला दुरदृश्‍यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र नागपूरमध्ये उभारले जात आहे. पहिल्या टप्प्यात या केंद्रासाठी २०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यासाठी भरघोस निधीची शिफारस परिषदेने केली आहे.

https://agrowon.esakal.com/agro-special/international-agriculture-facility-centre-maharashtra-502-crore-rat16

माहिती शेअर करा