राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान राज्यात २०२६-२७ मध्ये राबविण्यासाठी १५१ कोटी रकमेच्या वार्षिक कृती आराखड्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. राज्यात हे अभियान राबविण्यासाठी केंद्राचा हिस्सा (६०%) ८८ कोटी ३७ लाख ८९ हजार व राज्याचा हिस्सा (४०%) ५८ कोटी ९१ लाख ९३ हजार रुपये इतका आहे. तसेच प्रशिक्षण घटकासाठी १०० टक्के केंद्रीय सहाय्य ३ कोटी ८६ लाख ६३ हजार रुपये मिळून एकूण १५१ कोटी १६ लाख ४५ हजार रुपये इतक्या रकमेच्या वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्या आली आहे. याबाबतचा शासन निर्णय कृषी, पशूसंवर्धन विभागाने जारी केला आहे.
सन २०२५-२६ पासून राज्यात राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान राबविण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या सूचनांनुसार सन २०२५-२६ मध्ये अभियानांतर्गत राज्यात एकूण १७०९ गट स्थापन करण्यात आले आहे.
https://agrowon.esakal.com/agro-special/ethanol-petrol-e25-blending-india-policy-2025-abhi47