महाराष्ट्र १०वीच्या निकालात यंदा लातूर पॅटर्नचा डंका वाजला आहे! राज्यात एकूण १७९ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले असून, एकट्या लातूर विभागातील १०४ विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. कोकण विभागाने सर्वाधिक निकालासह बाजी मारली असली, तरी १०० टक्के गुण मिळवण्यात लातूर आघाडीवर आहे. मुलींनी मुलांपेक्षा ५.४० टक्क्यांनी सरस कामगिरी केली आहे. वाचा, तुमच्या विभागात किती विद्यार्थ्यांनी मारली बाजी आणि निकालाची रंजक आकडेवारी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा १०वीचा निकाल जाहीर करण्यात झाला. राज्याचा यंदाचा निकाल ९२.०९ टक्के लागला आहे. फेब्रवारी-मार्च २०२६ च्या दहावीच्या परीक्षेला राज्यातील १५ लाख ४२ हजार ४७२ विद्यार्थी बसले होते. त्यातील १४ लाख २० हजार ४८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर राज्यातील ६ हजार ६१२ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
कोकण विभाग अव्वल तर छत्रपती संभाजीनगर तळाला
दहावीच्या विभागीय मंडळनिहाय निकालात यंदा कोकण विभागाने बाजी मारली आहे. तर छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक कमी निकाल लागला आहे. यंदा कोकण विभागात २५ हजार १७२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी २४ हजार ५७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे या विभागाची उत्तीर्णतेची टक्केवारी ही ९७.६१ टक्के आहे. तर टक्केवारीनुसार हा विभाग राज्यात अव्वल राहिला आहे. दुसरीकडे राज्यात छत्रपती संभाजीनगर विभाग तळाला राहिला आहे. या विभागातून एकूण १ लाख ८४ हजार ९४० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यातून १ लाख ६३ हजार ५२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे या विभागाची उत्तीर्णतेची टक्केवारी ८८.४१ टक्के राहिली आहे.
https://agrowon.esakal.com/agro-special/ethanol-petrol-e25-blending-india-policy-2025-abhi47