भारतीय ताज्या द्राक्षांच्या निर्यातीसाठी व्हिएतनामची बाजारपेठ खुली झाली असून, ६ मे २०२६ पासून निर्यातीला अधिकृत सुरवात झाली आहे. कृषी उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाने १३ मे रोजी यासंदर्भात परिप्रत्रक जारी केले.
व्हिएतनामच्या ‘प्लॅट प्रॉडक्शन अँड प्रोटेक्शन डिपार्टमेंट’ ने २८ एप्रिल रोजी भारतीय द्राक्षांना आपल्या बाजारपेठेत प्रवेश मंजूर केल्याची माहिती दिली होती. केंद्रीय कृषी मंत्रालयाने हे पत्र १ मे रोजी ‘अपेडा’ कडे पाठविले. या निर्यातीसाठी ‘ सिस्टीम अँप्रोच पद्धत बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे द्राक्ष बागेपासून कंटेनरपर्यंत प्रत्येक टप्प्यावर निश्चित नियम आणि तपासणी प्रक्रिया काटेकोरपणे पाळावी लागणार आहे.
https://agrowon.esakal.com/agro-special/ethanol-petrol-e25-blending-india-policy-2025-abhi47