राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीला अखेर मुहूर्त मिळाला असून मंगळवारी (ता. २) होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत कर्जमाफीचा प्रस्ताव सादर होणार आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबरोबरच कर्जमुक्ती देण्यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना सुचविण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने तयार केलेल्या अहवालात शेतकऱ्यांसाठी नेमकी कोणती पोतडी खोलणार आहे, याची उत्कंठा आहे.

‘‘महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू,’’ असे आश्वासन दिले होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने निवडून आल्यानंतर महायुती सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल, अशी अपेक्षा होती. मात्र राज्य सरकारने कानाडोळा केल्यानंतर माजी मंत्री बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली नागपूरमध्ये शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला होता.

त्यानंतर झालेल्या चर्चेदरम्यान राज्य सरकारने जूनअखेर शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, असे आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतरही सरकारने कोणतीच पावले न उचलल्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सर्व पक्षीय आमदारांनी विविध आयुधांद्वारे कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला होता.

https://agrowon.esakal.com/agro-special/maharashtra-farm-loan-waiver-cabinet-meeting-rat16

माहिती शेअर करा