आगामी खरीप हंगाम २०२६ च्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी बियाणे, खते आणि कीटकनाशके खरेदी करताना आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स, सीड्स डिलर्स असोसिएशनच्या (माफदा) वतीने महासचिव विपिन कासलीवाल यांनी केले आहे.
शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना बियाण्याचे नाव, कंपनीचे नाव, लॉट क्रमांक, लेबल क्रमांक, किंमत, अंतिम मुदत तसेच विक्रेत्याची माहिती तपासणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. बियाणे खरेदी केल्यानंतर बिल, बॅग आणि टॅग जतन करून ठेवावेत, असा सल्लाही देण्यात आला आहे.
सोयाबीन पेरणीसाठी किमान १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. ट्रॅक्टरद्वारे पेरणी करताना बियाणे अधिक खोल जाणार नाही याची दक्षता घ्यावी.घरचे किंवा विकत घेतलेले बियाणे वापरण्यापूर्वी त्याची उगवण क्षमता तपासून बीजप्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. कीटकनाशकांचा वापर करताना शिल्लक आणि नवीन औषधे एकत्र मिसळू नयेत. वाहतुकीदरम्यान बियाणे आणि खतांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच पावतीतील रक्कम रोख किंवा ऑनलाइन पद्धतीने भरल्याची नोंद ठेवावी.