अतिवृष्टीमुळे राज्यात आतापर्यंत ६६ लाख एकरवरील पिकांची हानी झाली आहे. नैसर्गिक आपत्तीचे पंचनामे वेगाने चालू आहेत. राज्य शासनाकडून शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात मदतीची रक्कम दिवाळीपूर्वीच जमा केली जाईल,’’ अशी ग्वाही कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

‘दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्टस् असोसिएशन’च्या (डीएसटीए) ७० व्या वार्षिक अधिवेशन व ‘शुगर एक्स्पो’चे उद्‌घाटन पुण्याच्या जे.डब्ल्यू.मॅरिएट हॉटलमध्ये सोमवारी (ता.२२) झाले. या वेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

प्रमुख पाहुणे म्हणून सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, शिखर बॅंकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, प्रभारी साखर आयुक्त दीपक तावरे, ‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, ‘यशदा’चे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड, साखर उद्योजक मृगेश निराणी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अरविंद गोरे, डीएसटीए मावळते अध्यक्ष एस. बी. भड, नवनिर्वाचित अध्यक्ष सोहन शिरगावकर, उपाध्यक्ष एस. डी. बोखारे, ‘सिस्टा’चे अध्यक्ष चिनप्पन, गुजरात सहकारी साखर उद्योगाचे प्रतिनिधी भावेश पटेल या वेळी व्यासपीठावर होते.

श्री. भरणे म्हणाले, ‘‘डीएसटीएने गेल्या ७० वर्षांत साखर उद्योगाला चालना मिळाली. मात्र, शेतकऱ्यांना समृद्धी करण्यासाठी अजूनही नवे वाण व तंत्रज्ञान पुरवावे लागेल. उसाला चांगला भाव, कारखाना कामगारांना योग्य पगार व बोनस मिळवून देण्यासाठी नवे पर्याय शोधावे लागतील.’’

https://agrowon.esakal.com/agro-special/farmers-affected-by-heavy-rains-will-get-help-before-diwali-rat16

माहिती शेअर करा