तुर्कस्तान, अफगाणिस्तान, अमेरिका तसेच चीनमधून वाढलेल्या बेदाणा आयातीमुळे भारतीय बेदाणा उद्योग अडचणीत सापडला असून बेकायदा आयातीचा थेट परिणाम स्थानिक बेदाण्याच्या दरावर होत आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने भारतीय बेदाणा उद्योगाच्या संरक्षणासाठी कठोर धोरण लागू करावे, अशी मागणी महाराष्ट्रातील बेदाणा उत्पादकांकडून करण्यात येत आहे.

भारत हा जगातील प्रमुख द्राक्ष आणि बेदाणा उत्पादक देश असून महाराष्ट्रातील नाशिक, सांगली, सोलापूर आणि पुणे परिसर हा देशातील प्रमुख बेदाणा उत्पादन पट्टा मानला जातो. राज्यातील लाखो शेतकरी द्राक्ष व बेदाणा उद्योगावर अवलंबून आहेत. मात्र काही बेदाणा बेकायदा भारतीय बाजारपेठेत येत असल्याने स्थानिक उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याची तक्रार आहे.

विशेषतः कमी किमतीतील आयात माल, कमी मूल्य दाखवून होणारी आयात, शुल्क चुकवेगिरी तसेच चुकीच्या ‘उत्पत्ती देशा’चा (कंट्री ऑफ ओरिजिन) वापर यामुळे भारतीय बेदाण्याच्या दरावर गंभीर परिणाम होत आहे.भारतात बेदाण्यावर उच्च आयात शुल्क असतानाही काही व्यापारी बेकायदा मार्गांचा वापर करून कमी शुल्क भरून बेदाणा आयात करत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. परिणामी महाराष्ट्रातील बेदाणा उत्पादकांना उत्पादन खर्चही निघणे कठीण होत आहे.

https://agrowon.esakal.com/market-intelligence/maharashtra-raisin-industry-policy-demand-rat16

माहिती शेअर करा